breaking-newsआंतरराष्टीय

‘त्या’ फुटबॉल संघाला बाहेर काढण्यासाठी लागणार काही महिने

चियांग राय  : थायलंडमधील चियांग राय प्रांतातील थांम लुआंग नांग नोन गुहेत बेपत्ता झालेल्या फुटबॉल संघाचा अखेर नऊ दिवसांनी शोध लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून थाय फुटबॉल संघांतली जवळपास ११ ते १६ वयोगटातील एकूण १२ मुलं आणि त्यांचे प्रशिक्षक या गुहेत अडकले होते. या संघाचा शोध घेण्यासाठी बचावकार्य सुरू होते.

अखेर ९ दिवसांनी या संघाला शोधण्यात यश आले असून सुदैवाने सगळे सुखरूप आहेत. मात्र त्यांच्यापुढील संकट अजूनही संपले नाही, कारण गुहेतून बाहेर काढण्यासाठी कदाचित एक आठवडा किंवा महिनाभराचा अवधी आणखी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे आणखी काही दिवस या मुलांना गुहेतच राहावं लागणार आहे. ही गुहा थायलंडमधली चौथ्या क्रमांकाची मोठी गुहा आहे. मात्र गुहेत सध्या पाणी शिरल्याने बचावकार्यात अडथळे येत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत या परिसरात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

पावसामुळे गुहेतील पाण्याची पातळी वाढत जाईन आणि या मुलांना गुहेबाहेर काढण्यात अडचणी येतील असे म्हटले जात आहे. तेरा जणांच्या ब्रिटीश पाणबुड्यांच्या टीमने सोमवारी रात्री १० वाजता या मुलांना शोधले. हा संघ गुहेत खूपच आत अडकला आहे. पाण्यामुळे गुहेत चिखलही मोठ्या प्रमाणात झाला आहे. या संघाला खाण्याची रसद पोहोचवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे काही औषधं देखील त्यांना देण्यात आली आहे. चार महिने पुरेल इतकी रसद त्यांना पुरवण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button