“तुम्हारे शौर्य के गीत, कर्कश शोर में खोये नहीं। गर्व इतना था कि हम देर तक रोये नहीं।”- केंद्रीय राखीव पोलीस दल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/14-feb-pulwama-.jpg)
नवी दिल्ली | महाईन्यूज
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला आज एक वर्ष पूर्ण झालं असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. जम्मूहून श्रीनगरला जाणाऱ्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर गेल्या वर्षी 14 फेब्रुवारी रोजी भ्याड हल्ला झाला होता. या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. पुलवामा हल्ल्यातील शहिदांना पंतप्रधानांसह दिग्गजांनी श्रद्धांजली वाहिली आहे. सीआरपीएफनेही आपल्या शहिद जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसेच शहिदांना दिलेलं वचन पूर्ण करत सलाम केला आहे.
गर्व इतना था कि हम देर तक रोये नही… असं म्हणत CRPF ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये ‘तुमच्या शौर्याचं गीत कर्कश गोंधळात हरवलं नाही. अभिमान इतका होता की रडलो नाही. आम्ही विसरलो नाही आणि आम्ही माफ केलं नाही. पुलवामामध्ये देशासाठी बलिदान देणाऱ्या आमच्या बांधवांना आमचा सलाम. आम्ही त्याच्या कुटुंबियांसमवेत खांद्याला खांदा लावून खंबीरपणे उभे आहोत’ असं ट्विट सीआरपीएफने केलं आहे.