breaking-newsराष्ट्रिय

ताजमहालमध्ये नमाज पठण करण्यावर बंदी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने ताजमहालमध्ये नमाज पठण करण्यावर बंदी घातली आहे. ताजमहाल हे जगातले सातवे आश्चर्य आहे. त्यामुळे ताजमहाल परिसरात नमाज पठण करण्यासाठी परवानगी देता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. इतर ठिकाणीही नमाज पठण केले जाऊ शकते. मग ताजमहालमध्ये नमाज पठण करण्याची काय गरज आहे, असा सवालही न्यायालयाने विचारला आहे.

ताजमहालमध्ये होत असलेल्या नमाज पठणावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय इतिहास संकलन समितीने ऑक्टोबर 2017मध्ये बंदी घालण्याची मागणी केली होती. ताजमहाल ही राष्ट्रीय संपत्ती आहे. मुसलमानांना धार्मिक स्थळाच्या रूपात ही राष्ट्रीय संपत्ती वापरण्याचा हक्क दिला गेला आहे काय, असा प्रश्न अखिल भारतीय इतिहास संकलन समितीने उपस्थित केला होता. जर ताजमहालमध्ये मुसलमानांना तुम्ही नमाज पठण करण्याचा अधिकार देत असाल तर हिंदूंनाही शिव चालिसेचा जप करण्याची परवानगी द्यावी, असे मत अखिल भारतीय इतिहास संकलन समितीने न्यायालयात याचिकेद्वारे मांडले होते.

दरम्यान, जगातील सातवे आश्चर्य असलेला ताजमहाल दर शुक्रवारी नमाज पठणासाठी बंद ठेवण्यात येत होता. त्याचा अनेक स्तरांतून विरोध दर्शवला जात होता. तर काहींच्या मते, ताजमहाल ही वास्तू शिव मंदिराच्या जागेवर बनवण्यात आली असून, ती एका हिंदू राजाने बनवली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ताजमहालमध्ये शीव चालिसा वाचण्याचा प्रयत्न केला असता सीआयएसएफच्या जवानांनी त्यांना रोखले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button