breaking-newsआंतरराष्टीय

डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐतिहासिक पाऊल; उत्तर कोरियाच्या सीमेवर किम जोंग उन यांची घेतली भेट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या इतिहासातील एक महत्वाचे पाऊल आज टाकले. त्यांनी उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाच्या सीमेवर जाऊन उत्तर कोरियाचे हुकुमशाहा किम जोंग उन यांची भेट घेतली. अमेरिकेच्या इतिहासात आजवर कोणत्याही राष्ट्राध्यक्षाने उत्तर कोरियामध्ये पाऊल ठेवलेले नाही. दरम्यान, ट्रम्प आणि उन यांच्यामधील ही तिसरी भेट ठरली. या भेटीमुळे दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी होईल असे मानले जात आहे.

एम्बेड केलेला व्हिडिओ

ANI

@ANI

US President Donald Trump meets North Korean leader Kim Jong-un in Demilitarized zone between North Korea and South Korea.

१७७ लोक याविषयी बोलत आहेत

या ऐतिहासिक भेटीसाठी ट्रम्प दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या दोन्ही देशांना विभागणाऱ्या काँक्रिटच्या सीमाभिंतीजवळ पोहोचले. या ठिकाणी उन यांनी त्यांचे हस्तांदोलन करीत स्वागत केले. त्यानंतर दोघांनी उत्तर कोरियाची सीमा ओलांडून पुढील प्रवास सुरु केला. तत्पूर्वी ट्रम्प यांनी उत्तर कोरियाच्या सीमेवर पाऊल ठेवताच उन यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी हस्तांदोलन करीत छायाचित्रही काढून घेतले. त्यानंतर या दोन्ही नेत्यांनी दक्षिण कोरियाच्या दिशेने चालत जाऊन तिथे उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ट्रम्प म्हणाले, जगासाठी हा एक मोलाचा क्षण असून इथे येणे माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे.

यापूर्वी ट्रम्प यांनी स्वतः या गोष्टीची माहिती दिली होती. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरियाच्या सीमेवरील सैन्याच्या ताब्यात नसलेल्या जागी जाऊन आपण किम जोंग उन यांच्याशी बैठक करणार आहोत. आम्ही खूपच चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत, असे ते म्हणाले होते.

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

US President Donald Trump meets North Korean leader Kim Jong-un in Demilitarized zone between North Korea and South Korea.

५६ लोक याविषयी बोलत आहेत

आपल्या ट्विटमध्ये ट्रम्प यांनी म्हटले होते की, चीनचे राष्ट्रपती शी. जिनपिंग यांच्या बैठकीसह अन्य महत्वाच्या बैठकींनंतर मी जपानहून दक्षिण कोरियाला जाणार आहे. त्याच ठिकाण जर उत्तर कोरियाच्या नेत्यांची इच्छा असेल तर सीमेवर त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी हस्तांदोलन करीत त्यांना हॅलो म्हणण्याची माझी इच्छा आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button