breaking-newsराष्ट्रिय

डेटिंग अ‍ॅपवर आठ लाख भारतीय पुरुष-महिलांच्या उड्या

भारतीयांमध्ये विवाहबाह्य संबंध ठेवण्याची मानसिकता मोठया प्रमाणात वाढली आहे. खास विवाहबाह्य संबंधांसाठी असणाऱ्या एका डेटिंग अ‍ॅपवरुन हे सत्य समोर आले आहे. आठ लाख विवाहित भारतीयांनी विवाहाबाह्य संबंधांसच्या डेटिंग अ‍ॅपवर नोंदणी केली आहे. टेक्नोलॉजीसाठी ओळखल्या जणाऱ्या बंगळुरुमधून या अॅपवर नोंदणी करणाऱ्यांची संख्या जास्त आहे.रिपोर्ट मधून समोर आलेल्या आकडयांवरुन, नव्या वर्षात हजारो भारतीय आपल्या जोडीदारांची फसवणूक करण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसत आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवडयात अनेक जोडपी कामावर रुजू झाली. मुलांच्या हिवाळयातील सुट्टया संपल्या होत्या. त्यानंतर एकाएकी डेटिंग अॅपवरील ट्रॅफिकमध्ये मोठया प्रमाणात वाढ झालेली आहे.

  • महिलादेखील मागे नाहीत

नोव्हेंबर २०१९ मध्ये या अ‍ॅपवर बंगळुरु, मुंबई, कोलकाता, दिल्ली, पुणे, नवी दिल्ली, हैदराबाद, चेन्नई, गुरगाव, अहमदाबाद, जयपूर, चंदीगड, लखनऊ, कोची, नोएडा, विशाखापट्टणम, नागपूर, सूरत आणि भुवनेश्वर या शहरातून पुरुषांनी नोंदणी केली होती. महिलादेखील यामध्ये मागे नाहीत. बंगळुरु, मुंबई, दिल्ली, कोलकाता, पुणे, हैदराबाद, चेन्नई, गुरगाव, चंदीगड, अहमदाबाद, जयपूर, कोची, नोएडा, लखनऊ, सूरत, गुवहाटी, नागपूर आणि भोपाळ या शहरातील महिलांनी नोंदणी केली.

नोंदणीत ५६७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ
लग्नापलीकडे जाऊन असे संबंध बनवण्यासाठी व्यक्तिगत पातळीवर अनेक जण इच्छुक आहेत. डेटिंग अ‍ॅपच्या नोंदणीत ५६७ टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाल्याचे फ्रेंच ऑनलाइन डेटिंग कम्युनिटी प्लॅटफॉर्मने म्हटले आहे. या वरुन डेटिंग अॅपची लोकप्रियता दिसून येते. नव्या वर्षात लोकांनी मनाशी काही गोष्टी ठरवलेल्या असू शकतात. त्यामुळे जानेवारी महिन्यात अशा प्रकारे ट्रॅफिक वाढलेले असू शकते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button