breaking-newsराष्ट्रिय

टीएमसीचा एक आमदार १२ नगसेवकांसह भाजपाच्या वाटेवर

तृणमुल काँग्रेसचे नोवपारा येथील आमदार सुनील सिंह यांनी सोमवारी भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे केवळ तीन दिवस अगोदरच ते तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री मायावतींबरोबर यांच्याबरोबर एका व्यासपीठावर उपस्थित होते. आमदार सुनील यांच्याबरोबर टीएमसीच्या १२ नगरसेवकांनी देखील भाजपात प्रवेश केला आहे.

ANI

@ANI

Delhi: TMC Nowpara MLA Sunil Singh and 12 TMC Councillors join BJP in presence of BJP leaders Kailash Vijayvargiya and Mukul Roy.

३१५ लोक याविषयी बोलत आहेत

आमदार सुनील सिंह यांचा भाजपा प्रवेश हा लोकसभा निवडणुक निकालनंतर टीएमसीमधुन भाजपात जाणा-यामधील तिसरा प्रवेश आहे. ते गरूलीया नगरपालिकेचेही अध्यक्ष आहेत. भाजपा राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय आणि प्रदेश नेते मुकुल रॉय यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपाचा झेंडा हाती घेतला.

भाजपाकडे आता भातपारा, कंचरापरा, नैहाती, हलीशहर आणि गरुलीया नगरपालिकेत बहुमत आहे, या ठिकाणी आतापर्यंत टीएमसीची निर्विवाद सत्ता होती. आमदार सुनील सिंह यांच्या भाजपा प्रवेशामुळे संपूर्ण बराकपूर मतदारसंघ आता खासदार अर्जुन सिंह यांच्या अधिपत्याखाली आला आहे.

ANI

@ANI

TMC Nowpara MLA Sunil Singh along with 12 councillors will join BJP today in Delhi. He says, “Public in West Bengal wants ‘Sab ka Saath, Sabka Vikas’. In Delhi, there is Modi ji’s govt & we want the same govt to be formed in the state. So that we can develop West Bengal.”

१९७ लोक याविषयी बोलत आहेत

भाजपा प्रवेशा अगोदर एएनआयशी बोलताना आमदार सुनील सिंह यांनी सांगितले की, पश्चिम बंगालमधील जनतेला आता सबका साथ सबका विकास हवा आहे. दिल्लीच पंतप्रधान मोदींचे सरकार आहे आम्हाला देखील राज्यात तेच सरकार तयार करायचे आहे, तेव्हाच आम्हाला पश्चिम बंगालचा विकास करणे शक्य होईल.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button