झोपेच्या आजारामुळे सलग तीन आठवडे झोपून राहिली, वार्षिक परीक्षाही बुडाली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/Rhoda-Rodriguez-Diaz.jpg)
इंग्लंडमधील लीसेस्टर शहरामधील एका मुलीला झोपण्याचा आजार झाला आहे. रोडा रोड्रीक्यूझ-डायझ असं या मुलीचं नाव असून तिला झालेल्या आजारामुळे ती अनेक आठवडे झोपून राहते. या आजारामुळे तिला वार्षिक परीक्षेलाही बसला आले नाही असं तिने सांगितले.
रोडाला झालेल्या आजाराला वैद्यकीय भाषेत ‘क्लेन-लेविन सिंड्रोम’ असे नाव आहे. या आजारामध्ये रुग्णाला दिवसातील २२ तास झोप येते. हा आजार १० लाखांमध्ये एखाद्याला होतो. हा आजार झालेला रुग्ण सतत ग्लानीत असतो. अगदी जेवतानाही रुग्ण तंद्रीत असतो. रोडाला या आजारामुळे आपल्या दुसऱ्या वर्षाची वार्षिक परिक्षाही देता आली नाही. रोडा सलग तीन आठवडे झोपून असल्याने तिला परिक्षालेही जाता आले नाही असं ‘मेल ऑनलाइन’ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.
आपल्या आजाराबद्दल ‘मेल ऑनलाइन’शी बोलताना रोडा म्हणते, ‘लोक मला आळशी म्हणतात तेव्हा खूप राग येतो. मी या आजारातून बरं होण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र आजराचे स्वरुप पाहता मी काहीच करु शकत नसल्याचे वाईट वाटते.’ लहानपणी रोडाला झोप न येण्याचा आजार होता. मात्र सप्टेंबर २०१८ मध्ये सेंट थॉमस रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला ‘क्लेन-लेविन सिंड्रोम’ म्हणजेच ‘स्लिपिंग ब्युटी सिंड्रोम’ हा आजार झाल्याचे सांगितले. जेव्हा मला हा आजार झाल्याचे समले तेव्हा मला धक्काच बसला. या झोपेच्या आजारामुळे मला अनेक गोष्टी इच्छा असूनही करता येत नाही. या आजाराबद्दल लोकांना समजून सांगणेही कठीण आहे. अनेकांना माला होणारा त्रास समजच नाही, अशी खंत रोडा बोलून दाखवते. लहान असताना झोप न येण्याचा त्रास असणारी रोडा वयाच्या चौथ्या वर्षापासून आठवडाभर झोपून रहायची. त्यावेळी रोडाला नक्की कोणता आजार झाला आहे हे डॉक्टरांना तेव्हा कळू शकले नाही. वाढत्या वयाबरोबर रोडाचा आजार वाढत गेला आणि आता ती दीड ते दोन आठवड्याहून अधिक काळ झोपून असते.
‘लोकांना हा आजार मजेशीर वाटत असला तरी मला सतत मानसिक त्रास जाणवतो. या आजारामुळे माझ्या स्वभावतही बदल झाला आहे. अनेक दिवस झोपून राहिल्यानंतर जेव्हा मला जाग येते तेव्हा कुठे आयुष्य थोडं सामन्य वाटतं,’ असं रोडा सांगते.