जागतिक राजकारणाच्या दृष्टीने आजचा दिवस ठरणार महत्त्वाचा
सिंगापूर : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेल्या डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग या दोन महत्वाच्या नेत्यांची आज सिंगापूरमध्ये ऐतिहासिक भेट होत आहे. त्यामुळे अवघ्या जगाचे लक्ष या चर्चेकडे लागून आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग यांची ऐतिहासिक भेट आज सिंगापूरमध्ये होत आहे. या भेटीसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि किम जोंग दोन दिवस आधी रविवारी सिंगापूरमध्ये दाखल झाले आहेत. डोनाल्ड ट्रम्प हे जी-७ बैठक अर्ध्यावर सोडून सिंगापूरमध्ये दाखल झाल्याने या भेटीकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
भेटीची तारीख जाहीर झाल्यानंतर आम्ही दोघे मिळून जगात शांती राहावी यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू असेही ट्रम्प यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. सिंगापूरच्या सँटासा बेटावरील कपैला हॉटेलमध्ये या दोन नेत्यांची भेट होणार आहे. या भेटीसाठी किम जोंग हे ‘एअर चायना-७४७’ या विमानाने सिंगापूरमध्ये दाखल झाले.