Breaking-newsराष्ट्रिय
जम्मू काश्मीरमध्ये कोठडीतून आरोपीचे पलायन
जम्मू: हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या एका आरोपीने आज जम्मू काश्मीरमधील रायसी जिल्ह्यात पोलिस कोठडीतून पलायन केले. या प्रकरणी एक पोलिस उपनिरीक्षकास निलंबित करण्यात आले आहे. रोहित सिंह असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. आपल्याला गुदमरल्यासारखे होत असल्याचे या आरोपीने सांगितले होते. म्हणून त्याला कोठडीबाहेर मोकळ्या हवेमध्ये येऊ दिले गेले होते.
त्यानंतर तो पोलिस ठाण्यातून पळून गेला. त्याला, त्याच्या भावाला आणि आणखी एका व्यकतीला गेल्या आठवड्यात हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली होती. या पलायनासंदर्भात स्थ्हानिक पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिस उपनिरीक्षक अब्दुल कबीर वाणी याना याप्रकरणी निलंबित करण्यात आले आहे