breaking-newsराष्ट्रिय

जम्मू-काश्मीर: फुटिरतावाद्यांच्या बंदमुळे अमरनाथ यात्रा आज तात्पुरती स्थगित

फुटिरतावाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये बंद पुकारल्याने अमरनाथ यात्रा शनिवारी (आज) एका दिवसासाठी स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना जम्मूवरुन काश्मीर खोऱ्याकडे जाण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. बंदमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊन भाविकांना त्याचा त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

१३ जुलै हा दिवस जम्मू आणि काश्मीर राज्यात शहीद दिवस म्हणून पाळण्यात येतो. याच दिवशी १९३१ मध्ये डोग्रा महाराजाच्या सैन्याने श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाबाहेर गोळीबार करीत अनेक काश्मीरी नागरिकांचे प्राण घेतले होते. या शहीदांनी आठवण म्हणून आजच्या दिवशी राज्यात फुटिरतावादी नेत्यांनी बंद पुकारला आहे.

दरम्यान, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी देखील घटनास्थळी जाऊन या शहीदांना श्रद्धांजली वाहिली. दरम्यान त्यांनी राज्यापालांवर कठोर टीका केली. ते म्हणाले, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल हे भाजपाचे व्यक्ती आहेत, त्यामुळे त्यांनी या स्मृतीस्थळाला भेट दिलेली नाही.

हिमालय पर्वत रागांमध्ये असलेल्या पवित्र गुहेतील भगवान अमरनाथांचे दर्शन घेण्यासाठी अमरनाथ यात्रेचे आयोजन केले जाते. यंदा ही यात्रा १ जुलैपासून सुरु झाली असून १५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे, आत्तापर्यंत या यात्रेत दीड लाख भाविकांनी सहभाग नोंदवला आहे.

पवित्र गुहेपर्यंत पोहोचण्यासाठी कमीत कमी १४ किमी लांबीचा बालटल ट्रेक करुन जाता येते किंवा लांबच्या मार्गावरील ४५ किमीच्या पहलगाम ट्रेकद्वारेही इथे पोहोचता येते. या यात्रेतील दोन्ही बेस कँम्पर्यंत हेलिकॉप्टरने जाण्याचीही सुविधा आहे. विशेष बाब म्हणजे या गुहेचा शोध १८५० मध्ये मुस्लीम मेंढपाळ बुटा मलिक यांनी लावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button