breaking-news

जमिनीच्या वादातून गोळ्या झाडून एकाचा खून

पंढरपूर | महाईन्यूज

पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायतीच्या माजी सदस्यावर गोळी झाडून खून केल्याची घटना दुपारी एकच्या सुमारास घडलेली आहे. मृत्यू झालेल्या इसमाचे नाव विश्वास उर्फ बापू भागवत (वय ४०, रा. भाळवणी, ता. पंढरपूर) असे आहे.

विश्वास उर्फ बापू भागवत (वय ४०, रा. भाळवणी, ता. पंढरपूर) व विक्रांत म्हमाणे ( रा. भाळवणी) यांच्यामध्ये जमिनीचा कारणावरून वाद झालेला होता. रविवारी दुपारी एक वाजता विक्रांत म्हमाणे याने विश्वास भागवत यांच्यावर बंदुकीतून गोळ्या झाडल्या आहेत. याबाबत माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button