breaking-newsआंतरराष्टीय
जगातील सर्वांत मोठा ज्वालामुखी सक्रीय…
वॉशिंग्टन : जगातील सगळ्यात मोठा आणि सक्रीय ज्वालामुखी असलेला अमेरिकेतील हवाई बेटावरील किलुआ येथे फुटला आहे. त्याचा लाव्हारस तब्बल ३० हजार फुटापेक्षा देखील उंच उडाला आहे. त्यामुळे परिसरातील घरे रिकामी करावी लागली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. दरम्यान, हा लाव्हारस उसळल्याने या परिसरात प्रचंड उष्णता वाढली आहे. या ज्वालामुखीमुळे वातावरणामध्ये विषारी वायू पसरला आहे. दरम्यान आतापर्यंत यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.
सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असल्यामुळे हवाई बेटांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. अशावेळी ही घटना घडल्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने देखील विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत, असे येथील स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.