breaking-newsआंतरराष्टीय

जगभर दहशतवाद पसरवणारा पाकिस्तानच बनला दहशतवादाचा शिकार

वॉशिंग्टन (अमेरिका) – पाकिस्तान हे दहशतवादाचे माहेरघर आहे हे सारे जग जाणते मात्र स्वत: पाकिस्तानच दहशतवादाचा शिकार बनलेला आहे ही गोष्ट फार जणांना माहीत नाही. गेल्या 15 वर्षांत पाकिस्तानात दररोज सरासरी 12 लोक दहशतवादाला बळी पडलेले आहेत. म्हणजे “केले तुका झाले माका’ अशी पाकिस्तानची परिस्थिती झालेली आहे.

अमेरिकेच्या स्टेट डिपार्टमेंटच्या अहवालानुसार सन 2016 मध्ये जगभरात 11,072 दहशतवादी हल्ले झाले आणि त्यात सुमारे 25,600 लोक बळी पडले, तर सुमारे 33,000 लोक जखमी झाले. एकूण दहशतवादी हल्ल्यांपैकी 75 टक्के हल्ले दहा देशांमध्ये झाले. यात इराक प्रथम क्रमांकावर आहे. त्यानंतर अफगाणिस्तान, भारत, पाकिस्तान, फिलिपाईन्स, सोमालिया, तुर्की, नायजेरिया, येमेन आणि सीरिया यांचे क्रमांक लागतात. सन 2016 मध्ये एकट्या इराणमध्ये 2965 दहशतवादी हल्ले झाले.

सन 2017च्या जागतिक दहशतवाद सूचीनुसार दहशतवादाचा सामना करणाऱ्या टॉप 50 देशांना क्रमांक देण्यात आलेले आहेत. यात इराक प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर अफगाणिस्तान, नायजेरिया, सीरिया आणि पाकिस्तानचा क्रमांक लागतो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button