breaking-newsराष्ट्रिय

जगभरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने 2 कोटींचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली – जगात कोरोना व्हायरसचा विळखा अधिक घट्ट होत असून या व्हायरसमुळे जगातील 180 देश त्रस्त झाले आहेत. जगातील कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्याने 2 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. जगभरात आतापर्यंत 2 कोटी 16 हजार 302 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे संपूर्ण जगात 7 लाख 33 हजार 592 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1 कोटी 28 लाख 92 हजार 74 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

अमेरिकेत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून अमेरिकेत 51 लाख 99 हजार 431 रुग्णांची नोंद झाली. त्यापाठोपाठ ब्राझीलमध्ये 30 लाख 35 हजार 582 रुग्ण आढळले आहेत. भारत जगात तिसऱ्या स्थानी असून भारतात 22 लाख 14 हजार 137 रुग्णांची नोंद झाली. भारतापाठोपाठ रशिया आणि दक्षिण आफ्रिकेत रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आढळते. आफ्रिका खंडामध्ये कोरोनाबाधित रुग्णसंख्येने 5 लाखांचा टप्पा ओलांडला, अशी माहिती द आफ्रिका सेंटर फॉर डिसिझ कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन या संस्थेने दिली. दक्षिण आफ्रिकेत 5 लाख 59 हजार 859 रुग्ण आढळले असून 10 हजार 408 जणांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button