breaking-newsराष्ट्रिय
जंतर मंतरवर 12 पक्षांची निदर्शने; मूझफ्फरपूर आश्रम घटनेविरोधात एकजूट
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/Jantar_Mantar_New_Delhi_Misra_Yantra-.jpg)
नवी दिल्ली: बिहारमधील मुझफ्फरपूरमधील महिला आश्रमामधील मुलींच्या लैंगिक शोषणाविरोधात शनिवारी जंतर मंतर वर 12 पक्षांच्या नेत्यांनी निषेध आंदोलन केले. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी या प्रकरणातील दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास करण्यात यावा, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राष्ट्रीय जनता दलाचे तेजस्वी यादव आणि लोकक्रांतिक जनता दलाचे नेते शरद यादव यांनी यावेळी केली. बिहार सरकारने हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे.
यावेळी उपस्थित असलेल्या अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सिताराम येचुरी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे डी. राजा आणि अतुल कुमार अंजन, राष्ट्रीय जनता दलाचे मनोज झा आणि मिसा भारती, तृणमूल कॉंग्रेसचे दिनेश त्रिवेदी आणि द्रमुकचे टी.के.एस. एलान्गोवान हे उपस्थित होते.