breaking-newsराष्ट्रिय

चेन्नई ते पोर्ट ब्लेअर यांना जोडणाऱ्या सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल लिंकचे मोदींच्या हस्ते सोमवारी उद्घाटन

नवी दिल्ली – चेन्नई ते पोर्ट ब्लेअर यांना जोडणाऱ्या सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल लिंक या प्रकल्पाचे उद्घाटन सोमवारी 10 ऑगस्टला करणार आहेत. हा उद्घाटन सोहळा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.

नरेंद्र मोदी यांनी 30 डिसेंबर 2018 ला पोर्ट ब्लेअर येथे या प्रकल्पाची पायाभरणी केली होती. पोर्ट ब्लेअर सोबतच आर्टिकल फायबर केबल स्वराज द्वीप, लिटल अंदमान, कार निकोबार, कामोर्टा, ग्रेट निकोबार, लाँग आयलँड आणि रंगतला जोडण्यात येणार आहे. तसेच अंदमान आणि निकोबार बेटांवर भारताच्या इतर भागाच्या तुलनेत वेगवान आणि अधिक विश्वासार्ह मोबाइल सेवा आणि लँडलाईन टेलिकॉम सेवा पोहोचविणे शक्य होणार आहे.

हा प्रकल्प केंद्रीय दूर संचार मंत्रालयामार्फत युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंड (यूएसओएफ) च्या माध्यमातून पूर्ण करण्यात आला. दूरसंचार सल्लागार इंडिया लिमिटेडने (टीसीआयएल) तांत्रिक सल्लागार म्हणून या प्रकल्पाचे काम पाहिले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button