breaking-newsआंतरराष्टीय

चीनच्या राजदूतांचा इस्रायलमध्ये मृत्यू, घरात सापडला मृतदेह

तेल अविव :  चीनच्या इस्रायलमधल्या राजदुतांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. इस्रायलच्या तेल अविवमध्ये डु वेई त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. इस्रायलच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार डु वेई यांचा मृतदेह त्यांच्या बेडवर आढळला. डु वेई यांच्या मृत्यूचं कारण अजून समजू  शकलेलं नाही.

फेब्रुवारी महिन्यामध्येच ५७ वर्षांच्या डु वेई यांची चीनचे राजदूत म्हणून इस्रायलमध्ये नियुक्ती झाली होती. त्याआधी डु वेई युक्रेनमध्ये चीनचे राजदूत होते. डु वेई यांच्या कुटुंबात त्यांची बायको आणि मुलगा आहे, पण हे दोघं वेई यांचा मृत्यू झाला तेव्हा इस्रायलमध्ये नव्हते. तेल अविव जवळ असलेल्या हर्झलियामध्ये डु वेई राहत होते.

इस्रायलमधलं स्थानिक चॅनल असलेल्या चॅनल १२ टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार डु वेई यांचा झोपेतच नैसर्गिक मृत्यू झाला. राजदूतांच्या वेबसाईटवर डु वेई यांनी चीन आणि इस्रायलच्या संबंधांचं कौतुक केलं होतं.

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पॉमपिओ यांच्या इस्रायल दौऱ्यानंतर एका आठवड्यामध्येच डु वेई यांचा मृत्यू झाला आहे. या दौऱ्यामध्ये माईक पॉमपिओ यांनी इस्रायलला चीनच्या गुंतवणुकींवर मर्यादा आणायला सांगितलं होतं.

‘साथीच्या रोगांसोबतच षडयंत्र आणि बळीचा बकरा बनवण्याची मानसिकता येते, याला इतिहास साक्ष आहे,’ अशी सूचक प्रतिक्रिया चीनचे इस्रायलमधले राजदूतांचे प्रवक्ते वँग योंगजून यांनी दिली आहे. 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button