चार दशकांत 74 कोटी लोक दारिद्रयरेषेच्या वर-चीनची कामगिरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/china-national-flag-.png)
बीजिंग (चीन) – गेल्या चार दशकांत चीनने 74 कोटी लोक़ांना दारिद्रयरेषेच्या वर आणले आहे. चीनमधील एनबीएस (नॅशनलो ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स) ने ही माहिती दिली आहे. या अधिकृत माहितीनुसार या चार दशकांतील प्रत्येक वर्षात सरासरी 1.9 कोटी लोक दारिद्रय रेषेच्या वर आणले गेले आहेत.
चीनमधील ग्रामीण क्षेत्रातील गरिबी 84.2 टक्के कमी झाली आहे. म्हणजेच दर वर्षी सुमारे 2.4 टक्के गरिबी नष्ट करण्यात आलेली आहे. अध्यक्ष शी जिनपिंग यांची राजवट सुरू होण्यापूर्वीच्या 5 वर्षांत 67.8 कोटी लोक दारिद्रय रेषेच्या वर आणले गेले होते. देण्यात आलेल्या सरकारी आकडेवारीनुसार चीनच्या दारिद्रय निर्मूलनाच्या कामगिरीमुळे जगातील 70 टक्के गरिबी नष्ट झालेली आहे.
दारिद्रय निर्मूलन झालेल्या ग्रामीण क्षेत्रांतील नागरिकांच्या उत्पन्नात 2012 ते 2017 या कालावधीत उत्पन्नात दरवर्षी 10.4 टक्के वाढ झाली असल्याचे सरकारी वृत्तसंस्था शिन्हुआने म्हटले आहे.