चार्जिंगला लावलेल्या फोनवर गाणी ऐकताना झाला फोनचा स्फोट; तरुणीचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Dead.jpg)
तुम्हाला फोन चार्जिंगला लावून गाणी ऐकत झोपण्याची सवय असेल तर वेळीच सावध व्हा. कझाकिस्तानमध्ये अशाच प्रकारे फोन चार्जिंगला लावून गाणी ऐकता ऐकता झोपी गेलेल्या तरुणाची फोनचा स्फोट झाल्याने दुर्देवी मृत्यू झाला आहे. १४ वर्षीय अलुआ एस्टेकीझी अब्झल्बॅक असे या मुलीचे नाव आहे.
फोन चार्जिंगला लावून गाणी ऐकत झोपलेली अलुआ दुसऱ्या दिवशी मृत अवस्थेमध्ये अढळली. अलुकाने उशीजवळ ठेवलेल्या फोनचा स्फोट झाल्याने तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. जेव्हा घरच्यांनी तिच्या बेडरुमचा दरवाजा सकाळी उघडला तेव्हा ती मृत अवस्थेत अढळून आली. फोन चार्जिंगला लावलेल्या अवस्थेत तिच्या उशीजवळ होता. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार पोलिसांच्या तपास पथकाने या मुलीचा मृत्यू फोनचा स्फोट झाल्याने झाला असल्याचे म्हटले आहे. फोन चार्जिंगला लावला असता तो जास्त प्रमाणामध्ये गरम झाल्याने त्याचा स्फोट झाला असं पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले आहे. हा फोन कोणत्या कंपनीचा होता यासंदर्भातील माहिती पोलिसांनी दिलेली नाही.