breaking-newsराष्ट्रिय

गोव्याच्या मंत्र्यांना मुंबईत हदयविकाराचा झटका

पणजी – गोव्याचे उर्जा मंत्री पांडुरंग मडकईकर यांना हदयविकाराचा झटका आल्याने त्यांना मुंबईतील रूग्णलयात दाखल करण्यात आले आहे. ते काल मुंबई दौऱ्यावर आले असताना त्यांना हा झटका आला. त्यामुळे त्यांना काल रात्रीच कोकिळाबेन अंबानी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीविषयी अजून तपशील मिळालेला नाही असे आरोग्य मंत्री विश्‍वजीत राणे यांनी सांगितले.

53 वर्षीय मडकईकर हे भाजपच्या तिकीटावर कमभर्जुआ मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले आहेत. ते काल त्यांच्या काही खासगी कामासाठी मुंबईला गेले होते अशी माहिती प्रदेश भाजप सरचिटणीस सदानंद तानवडे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button