breaking-newsटेक -तंत्र

गुगलने हे 11 अॅप्स हटवले, तुम्हीही करा तात्काळ अनइन्स्टॉल

जगभरात सायबर क्राईमच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढत आहे. विविध अॅप्सच्या माध्यमातून डेटा चोरणे, तसेच फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत. यासंदर्भात गुगलने कडक पाऊलं उचलत 11 मोबाईल अॅप्स हटवले आहेत.

गुगलने प्ले स्टोर्सवरून 11 मोबाइल अॅप्स हटवले आहेत. या अॅप्सद्वारे फसवणूक केली जात होती. तसेच हे सर्व अॅप्स व्हायरस इनफेक्टेड होते. वृत्तसंस्थानी दिलेल्या माहितीनुसार या अॅप्सवर 2017 पासून गुगल लक्ष ठेवून होते. हे अॅप्स ट्रॅक केले जात होते. मालवेयर या अॅप्समध्ये एक नवीन रुपात आले होते. हॅकर्स या अॅप्सद्वारे युझर्सच्या कोणत्याही परवानगीशिवाय त्यांना प्रीमियम सर्विसेजसाठी सब्सक्राईब्स करत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, गुगलने याला आता प्ले स्टोअरवरून 11अॅप्स हटवले आहेत. त्यामुळे युझर्संनी सुद्धा हे अॅप्स तात्काळ डिलीट करणे गरजेचे आहे. गुगलने यावर्षी 1700 अॅप्सची एक यादी जारी केली होती. हे सर्व अॅप्स पडताळणी करून नंतर गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात येणार आहेत.

जर तुमच्या फोनमध्ये इनफेक्टेड अॅप्स असतील तर असे अॅप्स आपल्या स्मार्टफोनमधून तात्काळ अनइन्स्टॉल करा.

जे 11 अॅप्स गुगल प्ले स्टोअर वरून हटवण्यात आले आहेत त्याची यादी पुढे दिली आहे.

1. com.imagecompress.android
2. com.contact.withme.texts
3. com.hmvoice.friendsms
4. com.relax.relaxation.androidsms
5. com.cheery.message.sendsms (दोन वेगवेगळ्या रुपात)
6. com.peason.lovinglovemessage
7. com.file.recovefiles
8. com.LPlocker.lockapps
9. com.remindme.alram
10. com.training.memorygame
11. com.cheery.message.sendsms

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button