खुशखबर…! रेल्वेत मेगा भरती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/local-pune-1.jpg)
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने जवळपास भरतीसाठी प्रक्रिया सुरू केली आहे. एनडीए सरकार नोकरीच्या संधी निर्माण करण्यात अयशस्वी ठरल्याची टीका सतत विरोधकांकडून सरकारवर होते आहे रेल्वेने आरपीएफ/आरपीएसएफमध्ये 9,739 पदांसाठी भर्ती काढली आहे. यामधील 50 टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत. 1 जून पासून ही भर्ती प्रक्रिया सुरु होणार आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 30 जून, 2018 आहे.
रेल्वेमध्ये सुरक्षेच्या संबधित जवळपास 1 लाख 20 हजार जागा रिकाम्या आहेत. जास्तीत जास्त ग्राऊंड लेवल वर्कफोर्स भरती करून रेल्वे सेफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. ‘रेल्वेतील ही मेगा भरती गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित होतील. रेल्वेत दरवर्षी 40 ते 45 हजार कर्मचारी सेवानिवृत्त होतात. रेल्वे सुरक्षेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यासाठी सरकारला जवळपास 4 करोड रूपये अतिरिक्त खर्च करावा लागतो.