breaking-newsआंतरराष्टीय

कोरोना रुग्णांच्या संख्येत भारताने रशियालाही मागे टाकत भारत तिसऱ्या स्थानावर

 कोरोना रुग्णांच्या संख्येत भारताने रशियालाही मागे टाकले आहे . भारतात दिवसभरात 23 हजार 165 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाख 97 हजार 69 वर पोहोचला आहे. याशिवाय भारतात कोरोनामुळे एकूण 19 हजार 699 मृत्यू झाले आहेत .

कोरोनाबाधित रुग्णांच्या जागतिक क्रमवारीत रशिया तिसऱ्या स्थानावर होता. मात्र, भारतात आज दिवसभरात 23 हजारांहून जास्त रुग्ण आढळल्यामुळे भारत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रशियातील कोरोनाबाधितांचा आकडा 6 लाख 81 हजार 251 वर पोहोचला. तर मृतांचा आकडा 10 हजार 161 इतका आहे.

अमेरिका पहिल्या तर ब्राझील दुसऱ्या क्रमांकावर

कोरोना रुग्णांच्या जागतिक क्रमवारीत अमेरिका पहिल्या स्थानावर आहे. तर दुसऱ्या स्थानावर ब्राझील देश आहे. या दोन्ही देशांमध्ये कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. अमेरिकेत तर कोरोना रुग्णांचा आकडा 29 लाख 59 हजार 942 वर पोहोचला आहे. यापैकी 1 लाख 32 हजार 469 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा 15 लाख 79 हजार 837 वर पोहोचला आहे. यापैकी 64 हजार 383 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button