Breaking-newsराष्ट्रिय
कोरोनामुळे काँग्रेसच्या खासदाराचे निधन
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/mla.png)
चेन्नई – कोरोनामुळे अनेकांचे प्राण जात असताना आता काँग्रेसच्या एका खासदाराचेही निधन झाले आहे. कन्याकुमारीचे खासदार एस.वसंत कुमार यांचे कोरोनामुळे निधन झाले असून त्यांच्यावर १० ऑगस्टपासून चेन्नईच्या अपोलो रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.खासदार वसंत कुमार दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. 2019 मध्ये ते लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत पहिल्यांदाच खासदार झाले.
राहुल गांधी यांनी शोक व्यक्त करत म्हटलं, “काँग्रसचे कन्याकुमारीचे खासदार एच. वसंतकुमार यांचं कोव्हिड 19 मुळे झालेलं निधन खूप धक्कादायक आहे. त्यांची लोकांची सेवा करण्याच्या काँग्रेसच्या विचारांशी निष्ठा नेहमीच मनात घर करुन राहिल. त्यांच्या कुटुंबीयांना आणि स्नेहींसोबत सहवेदना.”