कोण आहेत नवनीत कौर राणा?;- शरद पवार
![नवनीत राणांच्या तक्रारीनंतर राज्यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना नोटीस](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/11/navneet-1.jpg)
नवी दिल्ली | महाईन्यूज
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप कायम आहे. राज्यातील सत्तास्थापनेचे पडसाद दिल्लीत उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली.या भेटीनंतर शरद पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा झाली. मात्र, सत्तास्थापनेबाबत आम्ही चर्चाच केलेली नसल्याचे सांगितले.
तसेच, अपक्ष खासदार नवनीत कौर राणा यांनी राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन राज्यात सरकार स्थापन करावे, असे म्हटले आहे. याविषयी पत्रकारांनी शरद पवारांना विचारले असता, कोण आहेत नवनीत कौर राणा? त्या आमच्या पार्टीचे धोरण ठरवणार का? असे सांगत शरद पवार यांनी नवनीत कौर राणा यांची शाळा घेतली.
दरम्यान, अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी राज्यातील राष्ट्रपती राजवटीला शिवसेना जबाबदार असल्याचे सांगत राष्ट्रवादी आणि भाजपाने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे, असे विधान केले आहे. शरद पवारांनी देशाचे नेतृत्व केले आहे. अनेकदा त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली आहे. पवारांनी नेहमी शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीने भाजपासोबत येऊन सरकार स्थापन करावे, असे नवनीत कौर राणा यांनी म्हटले आहे.