Breaking-news
“कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते”, उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/rohit-pawar-and-Ajit-pawar.jpg)
अहमदनगर: “कोणतंही काम घोळत न ठेवता थेट निर्णय घेण्याची दादांची स्टाईल असून ती मला भावते”, अशा शब्दात कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कौतुक केलेलं आहे. रोहित पवार यांनी आज (18 ऑगस्ट) अजित पवार यांची भेट घेतली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर अजित पवार आणि रोहित पवार यांच्यातील ही पहिली भेट होती.
रोहित पवार यांनी ट्विटरवर अजित पवार यांच्या भेटीची माहिती दिली आहे. मतदारसंघातील आणि इतर प्रश्नांसंबंधित चर्चा करण्यासाठी अजित पवार यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मात्र, या भेटीमागील खरा उद्देश अजून समोर आलेला नाही.