कैराना लोकसभा पोटनिवडणूक : राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सूम हसन विजयी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/tabassum-hasan-.jpg)
लखनऊ : कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत आज मतमोजणी झाली. भाजपाचे ज्येष्ठ नेते हुकूमसिंह यांच्या निधनामुळे येथील जागा रिक्त झाली होती. भाजपाने हुकूमसिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या रिंगणात होत्या. हसन यांना काँग्रेस, समाजवादी आणि बसप या तिन्ही विरोधी पक्षांनी पाठिंबा देत भाजपाला आव्हान दिले. राष्ट्रीय लोक दलाच्या तबस्सूम हसन यांनी मृगांका सिंहला पराभूत करत विजय मिळवला.
या मतदारसंघात मुस्लीम, जाट व दलितांचे प्रमाण मोठया संख्येने आहेत. कैरानामध्ये राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सूम हसन यांना काँग्रेस, समाजवादी आणि बसप या तिन्ही विरोधी पक्षांनी पाठिंबा देत भाजपाला आव्हान दिले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी या भागात जोरदार प्रचार केला होता.