breaking-newsराष्ट्रिय

केरळच्या मुख्यमंत्री व खासदारांची रेलभवनाबाहेर निदर्शने

नवी दिल्ली – केरळात रेल्वेची कोच फॅक्‍टरी सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने रद्द केल्याच्या निषेधार्थ केरळचे मुख्यमंत्री पिनारी विजयन आणि डाव्या पक्षाच्या खासदारांनी आज दिल्लीतील रेलभवनच्या समोर तीव्र निदर्शने केली.

केरळात पल्लकड जिल्ह्यात ही कोच फॅक्‍टीरी उभारली जाणार होती. पण केरळात मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरकार असल्याने त्यांच्यावर सूड उगवण्यासाठी मोदी सरकारने हा प्रकल्पच रद्द केला आहे असा आरोप विजयन यांनी केला आहे. ते म्हणाले की येथील कोच फॅक्‍टरी हलवून ती हरियानाला नेण्याचा घाट मोदी सरकारने घातला आहे. तशातच रेलमंत्री पीयुष गोयल यांनी उत्तरप्रदेश सरकारकडे रेलकोच फॅक्‍टरी साठी जागा मागितली आहे.

आमच्या राज्यातील फॅक्‍टरी रद्द करून भाजपशासित राज्यांत ती सुरू करण्याचा स्वार्थी उद्योग या सरकारने केला असल्याने त्याच्या विरोधात आम्हीं ही निदर्शने आयोजित केली आहेत अशी माहिती विजयन यांनी दिली. केरळातील ही प्रस्तावीत कोच फॅक्‍टरी साडे पाचशे कोटी रूपये खर्चून बांधली जाणार होती. इंदिरा गांधी पंतप्रधान असतानाच्या काळापासून आम्हाला या कोच फॅक्‍टरीचे आश्‍वासन देण्यात आले होते पण आमच्यावर सतत अन्यायच झाला आहे असे त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button