कॅन्सरपीडित सिनेटरची टवाळी करणाऱ्या सहायिकेची ट्रम्पकडून हकालपट्टी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/donald-trump.jpg)
वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेचे अध्यक्ष डोनॉल्ड ट्रम्प यांनी आपल्या एका सहायिकेची हकालपट्टी केली आहे. कॅन्सरग्रास्त सिनेटर जॉन मॅकेन यांची टवाळी केल्याबद्दल केली सेडलर हिची व्हाईटहाऊसमधून हकालपट्टी केली आहे. अध्यक्षांनी केलेल्या एका नामांकनाला विरोध करणाऱ्या जॉन मॅकेन यांच्याबद्दल अनुचित शेरा मारल्याबद्दल ट्रम्प यांनी ही कारवाई केली आहे, केली सेडलर आता व्हाईट हाऊसची सदस्य नाही, असे व्हाईट हाऊसचे उप प्रवक्ते राज शाह यांनी म्हटले आहे.
जॉने मॅकेन यांच्या मताला काहीच किंमत नाही, कारण ते आता मरणारच आहे, असे केली सेडलरने म्हटले होते. 81 वर्षाचे जॉन मॅकेन मेंदूचा कर्करोगाने पीडित आहेत. सीआयएच्या प्रमुख पदी जिना हॉस्पेल यांच्या नामांकनाला जॉन मॅकेन यांनी विरोध केला होता.
केली सेडलरने जॉन मॅकेनबाबत कर्मचाऱ्यांच्या बैठकीत गमती गमतीत टिपपणी केली होती. मात्र लोकांना तो चेष्टेचा सूरही पटला नाही. आणि केली सेडलरला व्हाईट हाऊसमधील नोकरी गमवावी लागली.