किमान दोन अपत्यांना जन्म द्या ; गोव्याच्या राज्यपालांचा तरुणांना सल्ला
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/mrudula-sinha-.jpg)
बेळगाव : गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी तरुणांना सल्ला दिला आहे. ‘फक्त एका अपत्यावर न थांबता दुसऱ्या अपत्याचाही विचार करा’,असा सल्ला सिन्हा यांनी तरुणांना दिला आहे. मुलांनी गोष्टी शेअर करणे शिकले पाहिजे, म्हणून घरात जर दोन मुलं असतील तरच ही गोष्ट शक्य आहे, असेही त्या म्हणाल्या.
केएलई अकॅडमीच्या एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. ‘सर्व तरुणांनी विवाह करावा. आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही व पती-पत्नीची काळजी घेऊ, असं अनेक विद्यार्थांनी मला वचन दिल्याचे त्यांनी म्हटले. ‘तरुण पिढीला मानवी मुल्यांचा आदर नाही, असं अनेकदा वृद्ध लोक बोलतात. पण माझा अनुभव वेगळा आहे.
आताची तरूण पिढी अतिशय जबाबदार असून ते वास्तवात वावरतात. हे सर्व भारतीय संस्कारांमुळेच शक्य झालं आहे. बाळ जेव्हा आईच्या गर्भात असतं तिथूनच हे सर्व संस्कार होतात, असं त्यांनी म्हटलं. शिक्षण हे स्वाक्षरतेसाठी व फक्त डिग्रीसाठी नसून ती शिकण्याची एक पद्धत आहे. ज्यामुळे प्रत्येकाचा दृष्टीकोन तयार होतो,असंही त्यांनी नमूद केलं.