Breaking-news
काश्मीरात दहशतवाद्यांकडून दोन नागरीकांची अपहरण करून हत्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/terrorist_.jpg)
श्रीनगर – लष्कर ए तोयबाच्या काही अज्ञात दहशतवाद्यांनी श्रीनगर शहरातील दोन नागरीकांचे अपहण केले आणि नंतर त्यांनी त्यांची गोळी मारून हत्या केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेच्या संबंधात माहिती देताना पोलिसांनी सांगितले की गुलाम हसन दर आणि बशीर अहमद दर या दोघांच्या घरात लष्कर ए तोयबाचे दहशतवादी घुसले आणि त्यांनी त्यांचे अपहरण करून काल रात्री नंतर त्यांची हत्या केली.
त्यांचे मृतदेह रहीम दर मोहल्ल्यातील एका मशिदी जवळ सापडले. ठार झालेले दोघेही काका पुतण्या होते. ही हत्या नेमक्या कोणत्या कारणावरून करण्यात आली याची माहिती मात्र अजून उपलब्ध होऊ शकलेली नाहीं. पोलिस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. मात्र या हत्येत लष्कर ए तोयबाच्या गनिमांचा सहभाग असल्याची बाब स्पष्ट झाली असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.