काश्मीरमधील भाजपा नेत्याचा सुरक्षा अधिकारी शस्त्रांसह फरार
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/bjp-01-1.jpg)
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – भारतीय जनता पक्षाच्या संरक्षण ताफ्यातील एक विशेष पोलीस अधिकारी शस्त्रांसह फरार झाल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलीसांनी दिली आहे. मोहम्मद मकबूल खान नावाच्या भाजपा नेत्याच्या संरक्षणासाठी तैनात असलेल्या या एसपीओ (स्पेशल पोलीस ऑफिसर) चे नाव वसीम अहमद मल्ला असून तो रफियाबादचा निवासी आहे.
आज सकाळपासूनच तो बेपत्ता असल्याचे सांगण्यात आले आहे. एसपीओ वसीम अहमद मल्ला हा एखाद्या दहशतवादी संघटनेत सामील होण्यासाठी फरार झाला आहे, की काय याबाबत पोलीसांनी काही निवेदन केले नसले, तरी ती शक्यता नाकारता येत नाही. सोपोरचे एसएसपी जावेद इक्बाल यांनी एसपीओ वसीम अहमद मल्ला फरार झाल्याच्या घटनेची पुष्टी केली आहे. या घटनेचा पोलीस् तपास करत असल्याचे जावेद इक्बाल यांनी सांगितले. गेल्या काही काळात अनेक पोलीस आणि लष्करी जवानांनी दहशतवादाचा मार्ग निवडला आहे.