breaking-news
कापसाच्या गंजीला आग; लाखोंचा माल आगीच्या भस्मस्थानी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/ry-ry-b.jpg)
यवतमाळ | महाईन्यूज
वणी तालुक्यातील निळापूर ब्राह्मणी मार्गावर असलेल्या एका जिनिंगमधील कापसाच्या गंजीला मंगळवारी दुपारी १.३० च्या सुमारास अचानक आग लागली. पाहता पाहता या आगीने रौद्र रुप धारण केले व तीत लाखो रुपयांचा कापूस जळून भस्मसात झाला. ही आग आटोक्यात आणली असून त्यामागचे कारण गुलदस्त्यात आहे. दोन महिन्यांपूर्वीही याच जिनिंगमध्ये आग लागून लाखोंच्या कापसाची होळी झालेली होती.