breaking-newsराष्ट्रिय

काँग्रेस मुख्यमंत्र्यांना पराभवाचा धक्का

मिझोराम विधानसभेसाठी मतमोजणी कडक सुरक्षा व्यवस्थेत सुरू आहे. काँग्रेसचे चार वेळचे मुख्यमंत्री लालथनवाला यांना पराभवाचा धक्का बसला आहे. लालथनवाला यांनी दोन जागेवरून निवडणुक लढवली होती. त्यामधील चाम्पाईमध्ये लालथनवाला यांना पराभवाचा धक्का बसला आहे. त्यांचा मिझो नॅशनल या पक्षाच्या (Mizo National Front) टीजे ललनुंतलुआंगा यांनी पराभव केला.

ANI

@ANI

Mizoram Chief Minister Lal Thanhawla has lost from Champhai South seat, MNF’s TJ Lalnuntluanga has won

74 people are talking about this

काँग्रेसने गेल्या निवडणुकीत ४० पैकी ३२ जागा जिंकून मिझो नॅशनल या पक्षाचे वर्चस्वच मोडीत काढले. चार वेळा मुख्यमंत्रिपद भूषविलेले काँग्रेसचे लालथनवाला पाचव्यांदा मुख्यमंत्रिपद मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मिझोराममध्ये ४० जागांसाठी १४२ उमेदवार रिंगणात आहेत; तर मतदारांची संख्या ६,९०,८६० आहे. मुख्यमंत्री लालथनवाला दोन मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत. त्यापैकी एका जागेवर त्यांना पराभवाचा झटका बसला आहे.

मिझोराममध्ये आता आलेल्या निकालानुसार मिझो नॅशनल या पक्षाने पुन्हा एकदा सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. मिझो नॅशनल पक्षाने २९ जागांवर आघाडी घेतली आहे. सत्ताधारी काँग्रेस पक्ष फक्त सहा जागांवर आघाडीवर आहे. भाजपा एक आणि अन्य चार जागांवर आघाडीवर आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button