काँग्रेस आमदाराची अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/congress-mla.jpg)
पंकी : झारखंडमधील पंकी येथील काँग्रेसचे आमदार बिट्टू सिंग यांनी एका अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याविषयीचा एक व्हिडिओ समोर आला असून तो सध्या व्हायरल झाला आहे. बिट्टू सिंग यांनी अधिकाऱ्याला जमिनीत गाडून टाकेन अशी धमकीच दिली. धमकीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बिट्टू सिंग ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरला जीवे मारण्याची धमकी देत असल्याचं स्पष्ट दिसत आहे.
या व्हिडिओत बिट्टू सिंग खुर्चीवर बसून ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसरला धमकावताना दिसत आहेत. ‘तुम्ही मला अजून ओळखलेलं नाही, मी तुम्हाला जमिनीमध्ये गाडून टाकू शकतो’, असे बिट्टू सिंग म्हणताना दिसत आहेत. १० मे रोजी हा प्रकार घडला आहे. धमकी देण्यात आलेले अधिकारी सत्यम कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, अरविंद तिवारी नावाच्या एका व्यक्तीने कार्यालयात येऊन सरकारी कामात अडथळा आणण्याचा प्रयत्न करत सरकारी कागदपत्रे फाडून टाकली. याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यासाठी जाणार होतो. तक्रार केली जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर आमदार बिट्टू सिंग यांनी कार्यालयात येऊन धमकी दिली. आमदार बिट्टू सिंग जबरदस्तीने माझ्या खुर्चीवर बसले. तर वारंवार जीवे मारण्याची धमकीदेखील दिल्याचे सत्यम कुमार यांनी सागितले