Breaking-newsराष्ट्रिय
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना रुग्णालयातून डिस्चार्ज
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/soniya.jpg)
नवी दिल्ली – नियमित तपासणीसाठी दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात दाखल झालेल्या काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना आज रविवारी दुपारी एकच्या सुमारास डिस्चार्ज देण्यात आला. सोनिया गांधी यांची प्रकृती आता स्थिर आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली. दरम्यान, सोनिया गांधी यांनी गुरुवारी पक्षाच्या राज्यसभा सदस्यांशी राजस्थानातील राजकीय संकट, कोरोना महामारी आणि भारत-चीन वाद या मुद्यांवर बैठक घेऊन चर्चा केली होती. या बैठकीनंतर त्यांना सायंकाळी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.