breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकची निवडणूक ठरली सर्वात महागडी

  • राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या खर्चाच्या तपशीलाच्या आधारे माहिती 

नवी दिल्ली – कर्नाटकात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी प्रचंड खर्च केला असून त्या खर्चाचा तपशील तपासल्यानंतर ही आजवरची सर्वात महागडी निवडणूक ठरली आहे. सेंटर फॉर मिडीया स्टडीज या संस्थेने सर्व खर्चाचा तपशील जमा केल्यानंतर ही बाब उघड झाली आहे. या निवडणुकीत राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांनी एकूण 9500 ते 10500 कोटी इतका प्रचंड खर्च केल्याचे दिसून आले आहे असे या संस्थेने म्हटले आहे. या खर्चात पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी झालेल्या खर्चाचा समावेश नाही. तो खर्च जमेला धरला तर खर्चाचा आकडा आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.

एका राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी झालेला एवढा प्रचंड खर्च पाहिल्यानंतर सन 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 50 ते 60 हजार कोटी रूपये खर्च होतील असा अंदाज या संस्थेचे एक अभ्यासक एन भास्करराव यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटकातील निवडणुकीची अधिसूचना 2 मे रोजी काढण्यात आली आणि 12 मे रोजी प्रत्यक्ष मतदान झाले. या दहा दिवसातील खर्चाबरोबरच प्रत्यक्ष अधिसूचना जाहीर होण्याच्या आधीही राजकीय पक्षांनी प्रचारावर प्रचंड प्रमाणात तेथे खर्च केल्याचे आढळून आले आहे.

कर्नाटकात निवडणुकांमध्ये जो खर्च झाला आहे त्यातील तब्बल 75 टक्के खर्च उमेदवारांनी व्यक्तीगत स्वरूपात केल्याचे आढळून आले आहे. या एकूण खर्चात राजकीय पक्षांकडून झालेल्या खर्चाचे प्रमाण 25 टक्के आहे असे संस्थेचे म्हणणे आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button