breaking-newsराष्ट्रिय

कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवल्याने इंधन महागणार?

नवी दिल्ली : ‘ऑर्गनायझेशन ऑफ द पेट्रोलियम एक्स्पोर्टिंग कंट्रीज’ अर्थात ‘ओपेक’ने कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर तेलाच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. या निर्णयाचे परिणाम लवकरच दिसण्यास सुरुवात होईल. तसेच, कच्च्या तेलाचे दर घटल्याने चालू वर्षात इंधनाच्या किंमती घसरतील अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता असून, पुढील वर्षात इंधनाची वाढणारी मागणी पाहता त्यांच्या किंमतीवर नियंत्रण ठेवणे अवघड होऊन बसेल, अशी भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.

‘ओपेक’द्वारे प्रतिदिन कच्च्या तेलाचे उत्पादन १० लाख बॅरलपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्यानंतर शनिवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत सहा टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली. ब्रेंट क्रूड प्रति बॅरल ७५.५५ डॉलरलर जाऊन पोहोचले. त्यामुळे पुन्हा एकदा देशांतर्गत बाजारात इंधनाच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे. तेलातील तेजी अशीच कायम राहिल्यास इंधनविक्री करणाऱ्या कंपन्यांवरील दबाव वाढण्याची शक्यता आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते ओपेक सदस्यांनी कच्च्या तेलाचे उत्पादन वाढविण्याच्या घेतलेल्या निर्णयाबाबत बाजार अद्याप अनभिज्ञ आहे.

कच्च्या तेलाची खरेदी आणि विक्री करणाऱ्या कंपन्या या निर्णयाबाबत साशंक आहेत. त्याचमुळे या निर्णयानंतर बाजारात विपरीत परिस्थिती पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनात वाढ झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात किंमती घटण्यास मदत होईल. त्यामुळे कच्च्या तेलाची आयात भारतासाठी स्वस्त होईल. त्यामुळे चालू वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर राहण्याची शक्यता आहे. मात्र, कच्च्या तेलाची भविष्यातील वाढती मागणी पाहता २०१९ मध्ये मात्र किंमती नियंत्रणात राहण्याची शक्यता कमीच असल्याचेही मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button