breaking-newsराष्ट्रिय

ओदिशा किनाऱ्यावरून अत्याधुनिक ‘हेलिना’ची चाचणी

हेलिकॉप्टरवरून रणगाडय़ाचा वेध घेणारे क्षेपणास्त्र

बालासोर (ओदिशा),  हेलिकॉप्टरवरून मारा करता येईल, अशा अत्याधुनिक रणगाडाविरोधी क्षेपणास्त्राची भारताने शुक्रवारी ओदिशा किनारपट्टीवरून चाचणी घेतली.

‘हेलिना’ असे या क्षेपणास्त्राचे नाव असून ती रणगाडाविरोधी ‘नाग’ या मार्गदर्शित क्षेपणास्त्रीची आधुनिक आवृत्ती आहे. हेलिनाचा माऱ्याचा पल्ला हा सात ते आठ किलोमीटर इतका आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टरवरून त्याची चाचणी करण्यात आली. बालासोर जिल्ह्यातील चांदीपूरमधील एकात्मिक चाचणी केंद्रातून दुपारी १२.५५ वाजता हे क्षेपणास्त्र डागण्यात आले, अशी माहिती संरक्षण दलातील सूत्रांनी दिली. अत्यंत सुरळीतपणे सुटलेल्या या क्षेपणास्त्राने अत्यंत अचूकतेने लक्ष्यभेद केला. यामुळे देशाची संरक्षणसिद्धता आणखी वाढली आहे. यापूर्वी हेलिनाची चाचणी जैसलमेर, पोखरण येथूनही करण्यात आली आहे.

हे क्षेपणास्त्र भारताच्या सामरिक सामर्थ्यांत मोलाची भर घालणारे ठरणार आहे.

जागतिक दर्जाचे अस्त्र

हेलिना हे जागतिक दर्जाचे क्षेपणास्त्र असून ते संरक्षण, संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) विकसित केले आहे. ते जगातील अत्याधुनिक अशा रणगाडाविरोधी क्षेपणास्त्रांपैकी एक असल्याचे संरक्षण दलातील सूत्रांनी सांगितले. इन्फ्रारेड इमॅजिंग सीकरद्वारे त्याचा मार्ग निश्चित केला जातो.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button