breaking-newsराष्ट्रिय

उन्नाव बलात्कार प्रकरणातील साक्षीदाराचा मृत्यू

  • राहुल गांधींनी व्यक्त केला कारस्थानाचा संशय 

नवी दिल्ली – देशभरात संतापाची लाट उसळवणाऱ्या उत्तरप्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणातील एका साक्षीदाराचा मृत्यू झाला. त्या प्रकरणात उत्तरप्रदेशातील भाजपचे आमदार कुलदीपसिंह सेंगर हे आरोपी आहेत.

निधन झालेल्या साक्षीदाराचे नाव युनूस असे आहे. तो काही दिवसांपासून आजारी होता. त्याला यकृताचा विकार होता. आजारपणामुळे त्याचे मागील आठवड्यात निधन झाल्याचे उत्तरप्रदेश पोलिसांकडून सांगण्यात आले. उन्नाव बलात्कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने साक्षीदारांच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य पोलिसांची असल्याचे म्हटले आहे. तर सध्या परदेश दौऱ्यावर असणारे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विटरवरून साक्षीदाराच्या मृत्यूमागे कारस्थान असल्याचा संशय व्यक्त केला. साक्षीदाराचा संशयास्पद मृत्यू झाला. शवविच्छेदनाविनाच त्याच्यावर घाईघाईने अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा आरोपही राहुल यांनी केला.

बलात्कार प्रकरणातील अल्पवयीन पीडितेच्या वडिलांवर हल्ला झाला. त्यानंतर त्यांचे तुरूंगात निधन झाले. शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत खोट्या आरोपांखाली पीडितेच्या वडिलांना अटक करण्यात आल्याचा आरोप झाला. त्यांच्यावरील हल्ल्यामागे आमदाराचा भाऊ असल्याचा आरोपही करण्यात आला. त्या हल्ला प्रकरणात युनूस साक्षीदार होता.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button