breaking-newsआंतरराष्टीय

उत्तर कोरियाशी चर्चा न झाल्यास पुढचे पाऊल उचलू

  • ट्रम्प यांनी दिला कडक इशारा 

वॉशिंग्टन – अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संयुक्त लष्करी कवायतीला विरोध करण्याचे कारण पुढे करून उत्तर कोरियाचे प्रमुख किंम जोंग यांनी अमेरीकन अध्यक्षांशी येत्या जून मध्ये होणारी चर्चा रद्द करण्याचा इशारा दिला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही आक्रमक भूमिका घेत ही चर्चा झाली नाहीं तर आम्ही पुढचे पाऊल उचलू असे म्हटले आहे.

किम जोंग यांनी ठरलेली शिखर बैठक रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रीयेत ट्रम्प यांनी म्हटले आहे की नेमके काय घडणार आहे याची आम्ही वाट पाहू. ठरल्याप्रमाणे बैठक झाली तर उत्तम. नाही झाली तर आम्हाला पुढचे पाऊल टाकल्याशिवाय गत्यंतर उरणार नाही. उत्तर कोरिया नीट वागला नाही तर त्यांच्या राष्ट्रप्रमुखांची लिबीयाचे प्रमुख मोअम्मर गद्दाफी यांची जशी अवस्था झाली तशी त्यांची अवस्था होईल.

गद्दाफी यांच्या नेतृत्वाच्या विरोधात देशात बंड झाले आणि जनतेने त्यांना ठार मारले अशी किम जोंग यांची अवस्था होऊ शकते असा इशाराही ट्रम्प यांनी दिली. उत्तर कोरियाच्या भूमिकेत अचानक बदल कसा काय झाला असा प्रश्‍न विचारता ट्रम्प म्हणाले की त्यांची चीनशी चर्चा झाल्यानंतर त्यांच्या भूमिकेत बदल होऊ शकतो. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा किम जोंग यांच्यावर प्रभाव आहे. किम जोंग हे शी जिनपिग यांना दोन महिन्याच्या अवधीत दुसऱ्यांदा भेटले असल्याकडेही ट्रम्प यांनी पत्रकारांचे लक्ष वेधले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button