Breaking-newsराष्ट्रिय
इन्कम टॅक्स रिटर्न दाखल करण्याची अंतिम मुदत तिसऱ्यांदा वाढवली
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2017/05/income.jpg)
नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात करदात्यांना दिलासा देण्यासाठी आयकर विभागाने इन्कम टॅक्स रिटर्न (आरटीआर )दाखल करण्याची अंतिम मुदतवाढ वाढवली असून आताही अंतिम मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवल्याची माहिती आयकर विभागाने ट्विटद्वारे दिली.
या आर्थिक वर्षांसाठी नवे आणि रिवाईज्ड इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख तिसऱ्यांदा वाढवण्यात आली. सर्वात पहिल्यांदा आयकर विभागाने रिटर्न दाखल करण्याची तारीख ३१ मार्च होती. त्यानंतर कोरोना संकटामुळे ती वाढवून ३० जून करण्यात आली. त्यानंतर पुन्हा एकदा ती मुदत वाढवून ३१ जुलै करण्यात आली आणि ती पुन्हा वाढवून ३० सप्टेंबर करण्यात आली.