breaking-newsआंतरराष्टीय

इंद्रा नुयींची वर्ल्ड बँकेच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार?

पेप्सिकोच्या माजी अध्यक्ष इंद्रा नुयी या जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. व्हाइट हाऊस हाऊस प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार इंद्रा यांच्याशिवाय ट्रेझरी विभागाचे अधिकारी डेव्हिड मालपास आणि ओव्हरसीज प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे (ओपिक) अध्यक्ष रे वॉशबर्न यांची नावेही चर्चेत आहेत.

विद्यमान अध्यक्ष जिम याँग किम यांनी १ फेब्रुवारीपासून पदमुक्त होणार असल्याची अचानक घोषणा केली होती. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्प यांनी नवा अध्यक्ष शोधणे सुरू केले. तेव्हापासून या तिघांच्या नावांची चर्चा सुरू झाली. ऑक्टोबरमध्ये इंद्रा नुयी यांनी पेप्सिको कंपनीचा राजीनामा दिला होता. मालपास हे परराष्ट्र मंत्रालयात ट्रेझरीचे अंडर सेक्रटरी आहेत. तर वॉशबर्न ऑगस्ट २०१७ पासून ओपिकचे अध्यक्ष आहेत. जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत या तिघांची नावे आघाडीवर आहेत.

१९४९ पासून जागतिक बँकेच्या अध्यक्षपदाची निवड अमेरिका करते. किम यांनी आपला कार्यकाळ संपण्याच्या तीन वर्षे आधीच जागतिक बँकेचे अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा कार्यकाळ वर्ष २०२२ मध्ये संपणार होता. अनेक प्रकरणांमध्ये ट्रम्प प्रशासनाबरोबरील मतभेदामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button