‘इंडियाज मोस्ट वॉंटेड’मध्ये झळकणार अर्जुन कपूर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/when-arjun-kapoor.jpg)
“रेड’ चित्रपटानंतर दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांच्या आगामी “इंडियाज मोस्ट वॉंटेड’ या चित्रपटात अर्जुन कपूर मुख्य भूमिका साकारत आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत आहे. याचे चित्रिकरण लवकरच सुरू करण्यात येणार असून तो पुढील वर्षी प्रदर्शीत करण्यात येणार आहे. दिग्दर्शक राजकुमार गुप्ता म्हणाले, या चित्रपटाच्या कथानक लिहिण्यासाठी मी दिर्घकाळापासून काम करत आहे. त्यांनी सलग तीन वर्षे कथानक लिहिण्याचे काम केले असून हे कथानक खूपच रोमांचक असे आहे. मुख्य भूमिकेबाबत अर्जुन कपूर म्हणाला की, भारतातील अनेक घटना या नागरिकांना प्रेरीत करणाऱ्या अशा आहेत. याबाबत शुक्रवारी त्याने ट्विट करत राजकुमार गुप्ता याच्या सोबतचा एक फोटो शेअर केला. या फोटोत एका वृत्तपत्राचे फ्रंट पेज दाखविण्यात आले आहे.
राजकुमार गुप्ता यांचे चित्रपट रियल इवेटंसवर आधारित असल्याने त्यांच्यासोबत काम करण्यासाठी उत्साहित आहे. या चित्रपटाचे कथानक ऐकल्यानंतर मी लगेच होकार दर्शविला. हा चित्रपट प्रत्येक भारतीयांमधील देशभक्ती जागृत करेल. तसेच हा चित्रपट बायोपिक नाही. मात्र, यातील माझी भूमिका ही खूपच आव्हानात्मक अशी आहे, असे अर्जुन याने सांगितले. दरम्यान, अर्जुन कपूर सध्या “नमस्ते लंडन’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत परिणीती चोप्रा मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारत आहे.