आसिया बीबीच्या पतीचे ब्रिटन, अमेरिका, कॅनडाला साकडे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/11/Aasia-Bibi-1-6.jpg)
इस्लामाबाद – ईशनिंदा प्रकरणात पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने आरोपमुक्त केलेली ख्रिश्चन महिला आसिया बिबीचा पती आशिक मसीहने जिवाला धोका असल्याचे सांगितले आहे. मसीहने ब्रिटन, अमेरिका किंवा कॅनडात आश्रय मागितला आहे. “मी ब्रिटनच्या पंतप्रधानांना विनंती करतो की, आमची मदत करा व शक्य होईल तेवढे आम्हाला स्वातंत्र्य द्या.’ असे एका ध्वनिचित्रफीत संदेशात मसीह म्हणाला, मसीहने कॅनडा व अमेरिकी नेत्यांकडेही मदत मागितली आहे.
त्याआधी मसीह यांनी जर्मन रेडिओला दिलेल्या मुलाखतीत पाकिस्तान सरकारची कट्टरपंथीय धार्मिक संघटना तहरिक-ए-लब्बॅक पाकिस्तान(टीएलपी)सोबतच्या करारास विरोध केला आहे. मसीह यांनी सांगितले की, ही न्यायपालिकेवर दबाव टाकण्याची चुकीच्या परंपरेची सुरुवात आहे. सरकारने कट्टरपंथीयांसमोर कधीही झुकले नाही पाहिजे. तुरुंगात आसियाच्या जिवाला धोका आहे. सरकारने तिला सुरक्षा पुरवावी. जिवाच्या धोक्यामुळे आसियाची बाजू मांडणारे वकील सैफुल मलूक यांनी शनिवारी पाकिस्तान सोडले.