breaking-newsराष्ट्रिय

आशियात पहिल्यांदा कोरोनाग्रस्तावर दुहेरी फुफ्फुसाचे यशस्वी प्रत्यारोपण

चेन्नई – कोरोनाच्या काळात पहिल्यांदाच भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. कोरोनाग्रस्त रुग्णावर फुफ्फुसाचे यशस्वीपणे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. चेन्नईमधील मल्टी-स्पेशियलिटी रुग्णालयात (एमजीएम) हेल्थ केअरमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णावर दुहेरी फुफ्फुसाचे यशस्वी प्रत्यरोपण करण्यात आले आहे.

आशियामध्ये पहिल्यांदाच कोरोनाग्रस्तावर अशी शस्रक्रिया करण्यात आली आहे. चेन्नईतील डॉक्टरांच्या टीमने ही शस्रक्रिया यशस्वीपणे पार पडली आहे. आशियात पहिल्यांदाच दुहेरी फुफ्फुस प्रत्यारोपण करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

रुग्णालयातील शस्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, हे फुफ्फुस दिल्लीहून चेन्नईला आणण्यात आले. त्यानंतर कोरोनाग्रस्त रुग्णावर त्याचे प्रत्यारोपण करण्यात आले आहे. फुफ्फुस दान करणारा व्यक्ती ३४ वर्षांची होती. मेंदू कार्य करायचा बंद झाल्यामुळे अपोलो ग्लेनेगल्स ग्लोबल रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. आपले अवयव दान करण्यात यावेत असे मृत्यूआधी त्याने डॉक्टरांना सांगितले होते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button