breaking-newsआंतरराष्टीय

…आणि तो आकाशातून जमिनीवर कोसळला, फायटर वैमानिकाच्या पत्नीची भावनिक पोस्ट

फायटर विमानाच्या अपघातात पतीचा मृत्यू झाल्यानंतर गरिमा अब्रोल यांनी इन्स्टाग्रामवर भावनिक पोस्ट लिहून आपला संताप व्यक्त केला आहे. मागच्या आठवडयात एअर फोर्सचे मिराज २००० विमान कोसळले. या दुर्घटनेत स्क्वाड्रन लीडर समीर अब्रोल आणि सिद्धार्थ नेगी या दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. एचएएल केंद्रात सुधारणा केलेल्या मिराज २००० विमानाची चाचणी सुरु असताना ही दुर्घटना घडली. नेगी डेहराडून तर अब्रोल मूळचे गाझियाबादचे होते. ते बंगळुरु येथील एअरक्राफ्ट अँड सिस्टिम चाचणी केंद्रात तैनात होते.

गरिमा अब्रोल यांनी आपल्या भावनिक पोस्टमध्ये व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर बोट ठेवले आहे. आपण आपल्या वीरांना लढण्यासाठी कालबाह्य झालेल्या मशीन्स देतो. ते त्यांनी सुद्धा शौर्य गाजवतात आपले सामर्थ्य दाखवून देतात.

तो थेट आकाशातून जमिनीवर कोसळला. कुटुंबांसह त्याची स्वत:ची स्वप्न, इच्छा सर्वाचा चक्काचूर झाला. दुसऱ्यांना प्रकाशाची वाट दाखवण्यासाठी कोणाला तरी धोका पत्कारावा लागतो. मला माझ्या नवऱ्याचा अभिमान आहे असे गरिमा अब्रोल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button