Breaking-newsआंतरराष्ट्रीयराष्ट्रिय
आंतराराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे निघालेल्या यानाचं इमर्जन्सी लॅन्डिग
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/roscosmos-759.jpg)
आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे जाण्यासाठी रवाना झालेल्या सोयुज नामक अंतराळयानाच्या इंजिनामध्ये बिघाड झाल्याने त्याचे इमर्जन्सी लॅन्डिग करण्यात आल्याचे वृत्त आहे. या यानात रशिया आणि अमेरिकेचे दोघे अंतराळवीर त्याचबरोबर चालकांच्या टीममधील दोघे असे एकूण चार जण प्रवास करीत होते. रशियाच्या वृत्तसंस्थांनी यासंदर्भात वृत्त दिले आहे.
इंटरफॅक्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, नासाचे सदस्य निक हेग आणि रशियाची अंतराळ एजन्सी एलेक्सी ओवचिनिन हे या यानातून कझाकस्तानमध्ये आपत्कालिन स्थितीत उतरले. या अंतराळ यानातून प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांना कुठलीही इजा झालेली नाही. यांपैकी ओवचिनिनची ही दुसरी अंतराळ यात्रा आहे.