breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेत शाळेत विद्यार्थ्याने केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू

टेक्सास : अमेरिकेतल्या टेक्सास प्रांतातील एक शाळा गोळीबाराच्या घटनेने हादरली. एका विद्यार्थ्याने अचानक केलेल्या गोळीबारात 10 जणांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी आहेत. मृतांमध्ये ब-याच विद्यार्थ्यांचाच समावेश आहे. गोळीबार प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली असून, या दोघांपैकी एकाने गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टेक्सास प्रांतातील ह्युस्टन शहरापासून 50 किमी अंतरावर असलेल्या सांता फे हायस्कूलमध्ये हा गोळीबार झालाय. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत अशा अनेक गोळीबाराच्या घटना घडत आहेत. तसेच सात दिवसांतील शाळांमधील ही तिसरी गोळीबाराची घटना आहे. फेब्रुवारी महिन्यातही फ्लोरिडातल्या पार्कलँड शाळेत अशाच प्रकारे गोळीबार झाला होता. त्यात 17 जणांना स्वतःच्या प्राणांना मुकावे लागले होते. आतापर्यंत अमेरिकेत वर्षभरात 22 वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. तसेच या गोळीबारांच्या घटनांना अमेरिकेतलं गन कल्चर काही प्रमाणात जबाबदार असल्याचीही चर्चा आहे.

The Associated Press

@AP

Texas Gov. Greg Abbott says 10 people killed, 10 wounded in a shooting at a high school in Santa Fe. http://apne.ws/MYjS9WF 

https://storage.googleapis.com/afs-prod/media/media:a8a078fdd27740f1813b54a8e16c4f76/800.jpeg

The Latest: Victim ID’d as Pakistani exchange student

SANTA FE, Texas (AP) — The Latest on a shooting at a high school in Santa Fe, Texas (all times local): 8:20 p.m. A leader at a program for foreign exch

apnews.com

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button