breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिका सोडून सर्वांशी संबंध वाढवा – इराणचे नेते खामेनी

तेहरान: अमेरिकेला बाजूला ठेऊन जगातील अन्य देशांशी इराणने आपले संबंध वाढवावेत असे प्रतिपादन इराणचे सर्वोच्च नेते अलि खामेनी यांनी केले आहे. खामेनी यांनी इराणचे अध्यक्ष हसन रौहानी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्यांची काल एकत्र बैठक घेऊन सद्य राजकीय स्थितीवर चर्चा केली त्यावेळी त्यांनी हे प्रतिपादन केले. त्यांनी नमूद केले की इराणने अमेरिकेसारखे काही देश सोडून जगातील अन्य देशांशी आपले संबंध सुधारले पाहिजेत.
अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी इराणशी सन 2015 मध्ये केलेल्या अण्विक करारातून बाहेर पडून इराणवर पुन्हा निर्बंध लागू केले आहेत. त्यामुळे इराणशी आर्थिक संबंध कायम ठेवण्यात अशियायी आणि युरोपियन देशांना सध्या अडचण येत आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात खामेनी यांनी पश्‍चिमी देशांपेक्षा पुर्वेकडील देशाशी इराणने आता आपले संबंध वाढवावेत असे विधान केले होते. आता त्यांनी युरोपला इराणशी संबंध कायम ठेवण्याबाबतचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटले आहे की अमेरिकेने घातलेले निर्बंध झुगारून युरोपियन देशांनी आमच्याशी व्यापार कायम ठेवण्याची हमी द्यावी. अमेरिकेने इराणवर निर्बंध घातले असले तरी इराण सरकारच्या अधिकाऱ्यांनी त्याचा धैर्याने मुकाबला करून लोकांचे नितीधैर्य आणि आशा कायम ठेवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले.
Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button